Ladki Bahin Yojana E-KYC Rule: ​लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना! शासनाने ‘माझी लाडकी बहीण योजने’अंतर्गत ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक केले आहे. तसेच, काही बँकांच्या विलीनीकरणामुळे (Merger) त्यांची खाती आता योजनेसाठी अमान्य ठरली आहेत. त्यामुळे तुमचा पुढील हप्ता अडकू नये म्हणून त्वरित आवश्यक बदल करणे गरजेचे आहे.

ई-केवायसी (e-KYC) नंतर होणारे मोठे बदल:

  • अपात्रता समाप्त: ई-केवायसीमुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरलेल्या महिलांचा लाभ बंद केला जाईल.
  • पुरुष लाभार्थी बाद: जे पुरुष महिलांच्या नावावर लाभ घेत आहेत, त्यांचा लाभ देखील ई-केवायसी तपासणीनंतर ताबडतोब थांबवला जाईल.
  • वेळेवर हप्ते: ज्या महिला पात्र असतील, त्यांना त्यांचे वाढीव हप्ते (₹ २,१०० प्रमाणे) वेळेवर मिळतील.
  • बँक खाते अपडेट अनिवार्य: ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान विलीनीकरणांमुळे बदललेले बँक खाते तपशील अद्ययावत करणे बंधनकारक आहे.

या आठ (८) प्रकारच्या बँकांमध्ये खाते असल्यास त्वरित बदला:

​बँकांच्या विलीनीकरणामुळे अनेक बँकांचे IFSC कोड बदलले आहेत. त्यामुळे, तुमचे जुने खाते या खालील बँकांपैकी कोणत्याही एका बँकेत असेल, तर तुम्हाला आता पैसे येण्यास १००% अडचण येणार आहे.

विलीन झालेली जुनी बँक (अमान्य)विलीन झालेली नवी बँक
१. देना बँक (Dena Bank)बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)
२. विजया बँक (Vijaya Bank)बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)
३. सिंडिकेट बँक (Syndicate Bank)कॅनरा बँक (Canara Bank)
४. अलाहाबाद बँक (Allahabad Bank)इंडियन बँक (Indian Bank)
५. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC)पंजाब नॅशनल बँक (PNB)
६. युनायटेड बँक ऑफ इंडिया (United Bank)पंजाब नॅशनल बँक (PNB)
७. आंध्रा बँक (Andhra Bank)युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India)
८. कॉर्पोरेशन बँक (Corporation Bank)युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India)
  • तातडीची कृती: जर तुमचे खाते वरीलपैकी कोणत्याही बँकेत असेल, तर ताबडतोब दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत नवीन खाते उघडून त्याला आधार लिंक (DBT/NPCI Mapping) करा किंवा तुमच्या विलीन झालेल्या बँकेतून नवीन आयएफएससी (IFSC) कोड घेऊन खात्याचा तपशील अपडेट करा.
  • परिणाम: हा बदल न केल्यास तुमचे पुढील हप्ते बँक खात्यात जमा होणार नाहीत आणि एकदा परत गेलेले पैसे परत मिळवणे खूप अवघड होईल.

माझी विनंती: ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या सर्व लाडक्या बहिणींपर्यंत त्वरित पोहोचवा, जेणेकरून कोणाचाही हप्ता अडणार नाही.

Leave a Comment