मोफत भांडी वाटप योजना पुन्हा सुरू! चला तर मग लवकर अर्ज करा, येथे सविस्तर माहिती पहा Bandhakam Kamgar Yojana List

Bandhakam Kamgar Yojana List : ​महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने (Maha BOCW) नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी सुरू केलेल्या मोफत भांडी वाटप योजना (Household Kit) ची ऑनलाईन प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. या योजनेत तुम्हाला १७ प्रकारांतील एकूण ३० वस्तूंचे भांडी संच (Kit) मिळणार आहेत.

​भांडी घेण्यासाठी अर्जदारांना ऑनलाईन अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे.

१. फॉर्मसाठी आवश्यक असलेला नोंदणी क्रमांक कसा काढायचा?

​फॉर्म भरण्यापूर्वी, तुमचा कामगार नोंदणी क्रमांक (Worker Registration Number) Active आणि Approved असणे आवश्यक आहे:

  1. प्रोफाईल लॉगिन: सर्वात आधी https://mahabocw.in/ या लिंकवर जा.
  2. माहिती भरा: तुमचा आधार नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका.
  3. OTP सत्यापन: ‘Proceed to Form’ वर क्लिक करा आणि मोबाईलवर आलेला OTP टाकून तो Validate करा.
  4. नोंदणी क्रमांक मिळवा: लॉगिन झाल्यावर तुमचा फॉर्म दिसेल. इथे तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number) कॉपी करून घ्या.

२. भांडी वाटपसाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट फॉर्म भरण्याची प्रक्रिया

​नोंदणी क्रमांक मिळाल्यावर, भांडी किटसाठी अपॉइंटमेंट बुक करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

स्टेप १: अपॉइंटमेंट पोर्टलवर जा

स्टेप २: नोंदणी क्रमांक भरा

  • ​कॉपी केलेला कामगार नोंदणी क्रमांक (रजिस्ट्रेशन नंबर) भरा.
  • ​हा क्रमांक टाकल्यावर तुमची नाव, नोंदणी/नूतनीकरणाचा दिनांक, मोबाईल नंबर, आधार नंबर इत्यादी सर्व माहिती आपोआप स्क्रीनवर दिसेल.

स्टेप ३: कॅम्प/शिबिर निवडा

  • ​’सिलेक्ट कॅम्प’ (Select Camp) पर्यायातून तुम्हाला तुमच्या जवळचे किंवा सोयीचे असलेले शिबिर केंद्र निवडावे लागेल.

स्टेप ४: भेटीची तारीख (Appointment Date) निश्चित करा

  • ‘अपॉइंटमेंट डेट’ वर क्लिक करा.
    • लाल रंग: सुट्टी (त्या दिवशी केंद्र बंद).
    • पिवळा रंग: त्या दिवसाच्या अपॉइंटमेंट्स फुल (Full) झाल्या आहेत.
    • बाकीच्या तारखा: निवडण्यासाठी उपलब्ध असतील.
  • ​तुम्हाला सोयीची असलेली उपलब्ध तारीख निवडा आणि अपॉइंटमेंट निश्चित करा.

स्टेप ५: स्व-घोषणापत्र (Self-Declaration) डाउनलोड आणि अपलोड करा

  • ​फॉर्ममधील ‘डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट’ पर्यायावर क्लिक करून घोषणापत्र डाउनलोड करा.
  • ​घोषणापत्र प्रिंट करा, त्यात तुमचे नाव, नोंदणी क्रमांक भरा आणि सही करून ते पूर्ण करा.
  • ​भरलेल्या घोषणापत्राचा फोटो (JPG) काढून घ्या.
  • ‘चूझ फाईल’ (Choose File) वर क्लिक करून तयार केलेला फोटो अपलोड करा.

स्टेप ६: अपॉइंटमेंट स्लीप प्रिंट काढा

  • ​सर्व माहिती भरल्यावर ‘प्रिंट अपॉइंटमेंट’ वर क्लिक करा.
  • ​तुमची अपॉइंटमेंट स्लीप (पावती) तयार होईल, त्याची प्रिंट काढून घ्या.

३. भांडी घेण्यासाठी केंद्रावर जाण्याची प्रक्रिया

​तुमच्या अपॉइंटमेंट स्लीपवर तारीख आणि शिबिराचे केंद्र (Camp Address) स्पष्टपणे नमूद केलेले असेल.

  • केंद्रावर पोहोचा: तुम्ही निवडलेल्या तारखेला अपॉइंटमेंट स्लीप घेऊन केंद्रावर पोहोचा.
  • बायोमेट्रिक: केंद्रावर तुमचे बायोमेट्रिक (बोटांचे ठसे) घेतले जाईल.
  • फोटो: ऑनलाईन फोटो काढला जाईल.
  • भांडी संच: यानंतर तुम्हाला गृह उपयोगी संच (भांडी) वाटप केले जाईल.

Leave a Comment