Atal Pension scheme : ’अटल पेन्शन योजना’ (APY) ही केंद्र सरकारने देशातील नागरिकांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा मिळावी, या उद्देशाने ९ मे २०१५ रोजी सुरू केलेली एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेद्वारे नागरिकांना वयाच्या ६० वर्षांनंतर दर महिन्याला पेन्शन दिली जाते.
१. योजनेची संक्षिप्त माहिती आणि मुख्य फायदे
| विषय | तपशील |
|---|---|
| योजनेचे नाव | अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana – APY) |
| सुरुवात | ९ मे २०१५ रोजी (केंद्र सरकार) |
| उद्दिष्ट | नागरिकांना वयाच्या ६० वर्षांनंतर आर्थिक आधार देणे. |
| पेन्शनची रक्कम | गुंतवणुकीनुसार ₹ १,००० ते ₹ ५,००० पर्यंत (दरमहा) |
| लाभ मिळण्याचे वर्ष | वय वर्ष ६० पूर्ण झाल्यानंतर. |
| सरकारी योगदान | या योजनेत सरकारकडून ५० टक्के रक्कम (सरकारी मर्यादेनुसार) मिळते. |
| वारसदारांना लाभ | गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास, त्याच्या जोडीदाराला किंवा वारसदारांना पेन्शनचा लाभ मिळतो. |
२. योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आणि लाभ
- सुरक्षित वृद्धापकाळ: कमवत्या काळात केलेल्या मासिक गुंतवणुकीवर साठीनंतर पेन्शन मिळते, ज्यामुळे नागरिक कोणावरही अवलंबून राहत नाहीत.
- उपचार आणि गरजा: पेन्शनच्या माध्यमातून नागरिक वृद्धावस्थेत त्यांचे उपचार आणि दैनंदिन गरजा सहजपणे पूर्ण करू शकतात.
- अपंगत्व लाभ: अपघात किंवा अन्य कारणांमुळे अपंगत्व आलेल्या नागरिकांनाही या योजनेचा पुरेपूर फायदा घेता येतो.
- गुंतवणूक आणि पेन्शन: तुम्ही १८ ते ४० वर्षांदरम्यान दर महिन्याला किती रक्कम गुंतवता, यावर तुमची ६० वर्षानंतरची पेन्शन (₹१,००० ते ₹५,००० पर्यंत) अवलंबून असते.
३. योजनेत सहभागी होण्यासाठी पात्रता निकष
’अटल पेन्शन योजने’त सहभागी होण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:
- वयाची अट: अर्जदाराचे वय १८ ते ४० वर्षांदरम्यान असावे.
- राष्ट्रीयत्व: अर्ज करणारा नागरिक भारतीय असावा.
- गुंतवणुकीचा कालावधी: नागरिकाने किमान २० वर्षे या योजनेत गुंतवणूक केली पाहिजे.
- बँक खाते: नागरिकाचे बँक खाते आधार कार्डसोबत जोडलेले असणे आवश्यक आहे.
४. अर्जासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मोबाईल नंबर (आधार कार्डशी लिंक)
- राष्ट्रीयकृत बँकेचे खाते
- ईमेल आयडी
- दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
५. अर्ज करण्याची पद्धत (ऑनलाईन / ऑफलाईन)
नागरिक त्यांच्या सोयीनुसार ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करून खाते उघडू शकतात:
| पद्धत | प्रक्रिया |
|---|---|
| ऑनलाईन | बँकेचे नेट बँकिंग किंवा अँप्लिकेशन (Application) वापरा. ‘Investment’ पर्यायात ‘APY Scheme’ निवडून खाते उघडावे. ऑटो-डेबिट पर्याय निवडल्यास, दरमहा रक्कम आपोआप जमा होते. |
| ऑफलाईन | तुमच्या राष्ट्रीयकृत बँक शाखेत किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा. तेथील ‘अटल पेन्शन योजनेचा फॉर्म’ भरून, सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडून जमा करावा. |