Ladki Bahin Yojana KYC Process: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेबाबत अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे. ई-केवायसी प्रक्रिया कधी सुरू होणार, ती कशी करायची, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी कशी करायची याबाबत नवीन जीआर (शासन निर्णय) आणि अपडेट आलेला आहे. योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि डीबीटी (DBT) मार्फत थेट महिलांच्या खात्यात ₹ १५०० जमा होण्यासाठी आधार ऑथेंटिकेशन बंधनकारक करण्यात आले असून, या पोस्टमध्ये आपण ई-केवायसीच्या सविस्तर प्रक्रियेबद्दल माहिती पाहणार आहोत.
ई-केवायसी (e-KYC) आवश्यक का?
- पडताळणी आणि प्रमाणीकरण: मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
- जीआर जारी: महिला व बालविकास विभागांतर्गत या संदर्भात नवीन जीआर जारी करण्यात आला आहे.
- लाभार्थ्यांची पात्रता: योजनेचे लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक लाभार्थी महिलांना ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
- प्रक्रिया: ई-केवायसी प्रक्रिया करण्यासाठी ऑनलाईन पद्धत असणार आहे, ज्याबद्दल शासनाने माहितीचा फ्लो चार्ट सुद्धा दिलेला आहे.
लाडकी बहीण योजना E-KYC सविस्तर प्रक्रिया (Ladki Bahin Yojana E-KYC Process)
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी शासनाने दिलेल्या फ्लो चार्टमधील पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील:
- अधिकृत वेबसाईट: लाभार्थ्यांना योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- बॅनरवर क्लिक करा: मुखपृष्ठावरील ‘ई-केवायसी’ बॅनरवर क्लिक करावे लागेल.
- आधार माहिती भरा: तिथे ई-केवायसी फॉर्म उघडेल.
- लाभार्थ्यांनी त्यांचा आधार क्रमांक नमूद करायचा आहे.
- पडताळणी संकेतांक (कॅप्चा) नमूद करायचा आहे.
- OTP वर क्लिक करा: आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून ‘ओटीपी’ (OTP) या बटणावर क्लिक करून घ्यायचा आहे.
- केवायसी तपासणी: ओटीपी आल्यानंतर, तुमची केवायसी आधीच पूर्ण झाली आहे का नाही, हे तपासले जाईल.
- केवायसी पूर्ण झाली असल्यास, “ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश प्राप्त होईल.
- केवायसी पूर्ण झाली नसल्यास, तुमचा आधार क्रमांक मंजूर यादीत आहे का नाही, हे तपासला जाईल.
- पती/वडिलांची माहिती:
- लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी स्क्रीनमध्ये टाकून ‘सबमिट’ बटणावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर, ई-केवायसी च्या स्क्रीनवर पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक आणि कॅप्चा नमूद करावा लागेल.
- दुसरा OTP: ‘सेंड ओटीपी’ बटणावर क्लिक केल्यानंतर पती किंवा वडील यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेल्या ओटीपी स्क्रीनमध्ये टाकून ‘सबमिट’ बटण क्लिक करावे लागेल.