मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु; येथे अर्ज करा लगेच भांडी सेट मिळणार Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form

Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form: तुम्ही जर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदीत आणि सक्रिय लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाने नोंदित बांधकाम कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा देण्यासाठी मोफत भांडी कीट योजना पुन्हा सुरू केली आहे. इमारत व इतर बांधकामाच्या व्यवसायात असलेले कामगार सतत स्थलांतर करत असल्याने, त्यांना भोजन तयार करण्यासाठी मदत व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. पात्र कामगारांना या योजनेंतर्गत गृहपयोगी ३० वस्तूंचा संच मिळणार असून, नोंदणीकृत कामगार लगेच अर्ज करू शकणार आहेत.

बांधकाम कामगार भांडी कीट योजना २०२५ (Bandkam Kamgar Bandhi Kit Yojana)

  • योजनेचा उद्देश: बांधकाम कामगारांना अत्यंत कमी पगारात काम करावे लागते आणि त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांना भोजन तयार करण्यास मदत व्हावी म्हणून ही योजना सुरू केली आहे.
  • लाभार्थी: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत आणि सक्रिय असलेले लाभार्थी.
  • लाभाचे स्वरूप: नोंदणीकृत बांधकाम कामगारांना ३० गृहपयोगी वस्तूंचा मोफत भांडी संच देण्यात येणार आहे.
  • अट: हे मोफत भांडी कीट फक्त त्याच बांधकाम कामगारांना मिळणार आहे, ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन केलेले सक्रिय कार्ड आहे.

भांडी कीट योजनेसाठी आवश्यक पात्रता

बांधकाम कामगार भांडी कीट योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • महाराष्ट्रात वास्तवता: अर्जदार कामगारांचे महाराष्ट्रात किमान १५ वर्षांचे वास्तवता असावे.
  • कामाचा अनुभव: कामगारांनी मागील १२ महिन्यांमध्ये ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे.
  • नोंदणी: अर्जदाराने मंडळात नोंदीत कामगार असावे आणि त्याची नोंदणी चालू असावी.

गृहपयोगी संचामध्ये समाविष्ट असलेल्या वस्तू

या गृहपयोगी वस्तू संचामध्ये खालीलप्रमाणे एकूण ३० वस्तूंचा समावेश असणार आहे:

गृहपयोगी संचातील वस्तूनग संख्या
ताट०४
वाट्या०८
पाण्याचे ग्लास०४
पातेले झाकण्यासह०१
कढई (स्टील)०१
प्रेशर कुकर (पाच लिटर, Stainless Steel)०१
परात०१
डब्बा झाकण्यासह (१४ इंच)०१
डब्बा झाकण्यासह (१६ इंच)०१
डब्बा झाकण्यासह (१८ इंच)०१
मसाला डब्बा (सात भाग)०१
पाण्याचा जग (दोन लिटर)०१
मोठा चमचा (भात वाटपा करिता)०१
मोठा चमचा (वरण वाटपा करिता)०१
पातेले झाकणासह (छोटी साईज)०२
एकूण भांडे३०

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

  • अर्ज सादर करणे: भांडी कीट योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना हमीपत्र भरून सादर करायचे आहे.
  • हमीपत्रातील माहिती: यामध्ये तुमचा नोंदणी क्रमांक, कुटुंबातील व्यक्तींची संख्या, त्यांची नावे आणि नाती, वितरित केलेल्या वस्तूंची माहिती, दिनांक व तुमची सही नमूद करावी लागते.
  • वस्तू तपासणी: नोंदणीनंतर गृहपयोगी वस्तू संच स्वीकारताना त्यातील सर्व वस्तू तपासणी करून घ्याव्या आणि त्याचा दर्जा तपासावा.
  • पोचपावती: वस्तू संच प्राप्त झाल्यावर, लाभार्थ्यांनी सरकारी कामगार अधिकारी (उपजिल्हा कार्यकारी अधिकारी) यांना पोचपावती सादर करावी.
  • वितरण: जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून दिलेल्या कालावधीत गृहपयोगी वस्तू संच वितरण केले जाते.

Leave a Comment