लाडकी बहीण योजनेची केवायसी नवीन प्रक्रिया आली! अवघ्या २ मिनिटांत पूर्ण करा अन्यथा नोव्हेंबरचा हप्ता बंद! DA Hike Update 2025

DA Hike Update 2025 : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी आता ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तुमच्या बँक खात्यात मासिक हप्ता न चुकता जमा होण्यासाठी खाली दिलेल्या नवीन आणि सोप्या पद्धतीने तुमची ई-केवायसी त्वरित पूर्ण करा. ( DA Hike Update 2025 )

महत्त्वाची नोंद: ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक आणि पती/वडिलांचा आधार क्रमांक आवश्यक असेल.

ई-केवायसी (e-KYC) करण्याची संपूर्ण सोपी प्रक्रिया (अवघ्या २ मिनिटांत)

तुमच्या मोबाईलमध्ये ही प्रक्रिया कशी पूर्ण करायची, याच्या सोप्या पायऱ्या खालीलप्रमाणे:

पायरी १: पोर्टलवर लॉगिन आणि आधार प्रमाणीकरण

  1. वेबसाईटवर जा: Google मध्ये “लाडकी बहिण महाराष्ट्र gov dot in” असे सर्च करून योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जा.
  2. e-KYC लिंक: मुखपृष्ठावर, “लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा” या पर्यायावर टच करा.
  3. आधार क्रमांक: लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक अचूक भरा.
  4. ओटीपी पाठवा: कॅप्चा कोड भरून, ‘मी सहमत आहे’ यावर टिक करा आणि नंतर ‘OTP पाठवा’ बटनावर क्लिक करा.
  5. OTP सबमिट करा: आधार लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला सहा अंकी OTP एंटर करून ‘Submit’ बटनावर टच करा.

पायरी २: कुटुंबाच्या आधार क्रमांकाची पडताळणी

  1. दुसरा आधार क्रमांक: पुढील पेजवर, लाभार्थी महिला विवाहित असल्यास पतीचा आधार क्रमांक आणि अविवाहित असल्यास वडिलांचा आधार क्रमांक टाका.
  2. ओटीपी पाठवा: कॅप्चा टाकून, ‘मी सहमत आहे’ वर टिक करा आणि पुन्हा ‘OTP पाठवा’ बटनावर क्लिक करा.
  3. OTP एंटर करा: ज्या व्यक्तीचा आधार क्रमांक टाकला आहे, त्यांच्या मोबाईलवर आलेला सहा अंकी OTP एंटर करा आणि ‘सबमिट करा’ बटनावर टच करा.

टीप: ज्यांच्या कुटुंबात वडील किंवा पती नाहीत, त्यांच्यासाठी सरकारने अजून कोणताही पर्याय काढलेला नाही. सरकारने यावर निर्णय घेताच, त्याची माहिती तुम्हाला दिली जाईल. DA Hike Update 2025

पायरी ३: जात प्रवर्ग निवड आणि महत्त्वाचे घोषणापत्र

  1. जात प्रवर्ग (Cast Category): आता तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग (Category) दिलेल्या यादीतून योग्यरित्या निवडायचा आहे.
  2. दोन महत्त्वाचे घोषणापत्र (Declaration): खालील दोन अत्यंत महत्त्वाचे पर्याय वाचून त्यांना ‘होय’ (Yes) निवडायचे आहे. (इथे चूक करू नका, दोन्ही पर्याय ‘होय’ सिलेक्ट करा)
    • सरकारी नोकरी: “माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम/मंडळ… मध्ये कार्यरत नाहीत…” (निवड: होय)
    • लाभार्थी संख्या: “माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे.” (निवड: होय)
  3. अंतिम संमती: खालील टर्म्स आणि कंडिशन वाचून त्यावर टिक मार्क करा.

पायरी ४: प्रक्रिया पूर्ण करा

सर्व माहिती भरून झाल्यावर ‘Submit’ बटनावर क्लिक करा.

तुम्हाला “e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे” (e-KYC Successful) असा मेसेज स्क्रीनवर दिसेल. ही संपूर्ण प्रक्रिया तांत्रिक अडचणींशिवाय अवघ्या २ ते ५ मिनिटांत पूर्ण होते.

Leave a Comment